सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून गौरव.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून गौरव.

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची विभागी बैठक सिंधुदुर्ग येथील हॉटेल आराध्या येथील मराठा समाज हॉल येथे उत्साहात पार पडली. हा पुरस्कार एमकेसीएलच्या मॅनेजमेंट डायरेक्टर विणा कामत यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी आणि संचालिका सावी साळवी, कन्या आदिती साळवी यांनी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी एकत्र स्वीकारला.

आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर संगणक प्रशिक्षण संस्था गेली 24 वर्षापासून आबलोली येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे. सलग 16 वर्ष संस्थेला पुरस्कार प्राप्त होत आहे.सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन नोकरीला लावणे, महाराष्ट्र ऑलंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षा आयोजन, इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी संदर्भात मार्गदर्शन, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन, फ्युचर वेध इ-टेस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स मार्गदर्शन, सांगा टक्के बक्षीस पक्के उपक्रम, इयत्ता दहावी- बारावी अंतिम निकालपत्र वाटप, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम, विद्यार्थी करियर मार्गदर्शन आणि स्नेहसंमेलन, जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त कार्यशाळा आयोजन, विविध शिबिरांचे आयोजन, दिनदर्शिका भेट, महिलांसाठी डिजिटल सहेली आदी. उपक्रम सातत्याने राबविल्याने सलग 16 वर्षीही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपल्या MS-CIT केंद्राच्या 24 वर्षाच्या प्रवासात हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. संगणक साक्षरते सोबत विद्यार्थ्यांना जॉब रेडी सुद्धा करत आहोत. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला. या यशात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि सर्व सहकाऱ्यांची आठवण पुरस्कार स्वीकारताना आली. पुरस्कारामुळे संस्थेचे नाव उंचावले आहे या यशामागे सुयश कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्थेतील सर्वच सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.हा अवॉर्ड मी माझ्या केंद्रात संगणक ज्ञान मिळवलेल्या तसेच कोर्स पूर्ण करून जॉब प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित करतो. अशी कृतज्ञता संदेश साळवी यांनी व्यक्त केली.

पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएलचे विभागीय सहव्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, नटराज सर, तुषार सर, कोकण विभाग समन्वयक मंगेश जाधव, रत्नागिरी जिल्हा समन्वयक संतोष कोलते, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली तसेच जिल्ह्यातील सर्व संगणक संस्थाचालक उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam