तळवली हायस्कूलमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…
(मंगेश जाधव – नवी मुंबई)
गुहागर – पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेत शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.*
*प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.वनश्री मुकनाक हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आपले विचार व्यक्त केले.तसेच जेष्ठ शिक्षिका सौ.ए.डी. नाईक मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी त्या काळातील परिस्थिती कशी होती. त्यावर मात करून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सर्व मुली शिकल्या पाहिजेत,समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी किती कष्ट घेतले, याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.*
*या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर,सौ.नाईक मॅडम,श्री.देवरुखकर सर,श्री.गुरसळे सर,श्री.केळस्कर सर,श्री.बागल सर, श्री.गवळी सर,सौ.कांबळे मॅडम,श्री.पुनस्कर सर, लिपिक श्री.कदम सर, श्री.अक्षय चव्हाण,श्री.प्रणय आरोलकर असे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीनी पार पाडली.प्रास्ताविक कु. मारीया घारे हिने केले तर स्वागत व सूत्रसंचालन कु.अपेक्षा कुळे हिने केले.कु.स्वरा जोशी हिने सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.