भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधातच गुन्हा; सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधातच गुन्हा; सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त!

 

 

मुंबई : भ्रष्टाचाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याच उपअधिक्षक बी. एम. मीना यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखला केला. याप्रकरणी देशभरात २० ठिकाणी छापे मारण्यात आले असून त्यात ५५ लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. सीबीआयने त्यांचेच उप अधीक्षक मीना आणि इतरांवर पदाचा गैरवापर करून विविध व्यक्तींकडून अनुचित लाभ घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.*

 

आरोपी अधिकारी वेगवेगळ्या मध्यस्थांच्या मदतीने लाचखोरीच्या रकमेचे बँक खाती आणि हवालाद्वारे व्यवहार केले, असा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने जयपूर, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली येथे २० ठिकाणी छापे मारले. या छाप्यांमध्ये रोख ५५ लाख रुपये जप्त करण्यात आले. ती रक्कम हवालाद्वारे पाठवण्यात आली होती. तसेच या छाप्यात सुमारे एक कोटी ७८ लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या मालमत्तेचे कागदपत्रे, एक कोटी ६३ लाख रुपयांच्या व्यवहारांच्या नोंदी दाखवणारी पुस्तके आणि अन्य आरोपींच्या विरोधातील पुरावे / दस्तऐवज सापडले . आरोपी अधिकारी बी.एम मीना मुंबईतील बीएसएफबी येथे कार्यरत असून याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करीत आहे.

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...