दुचाकी आहे? लाडक्या बहिणीचा अर्ज होणार बाद; सरसकट नाही म्हणत अदिती तटकरेंनी टाकला बॉम्ब!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुचाकी आहे? लाडक्या बहिणीचा अर्ज होणार बाद; सरसकट नाही म्हणत अदिती तटकरेंनी टाकला बॉम्ब!

 

 

मुंबई – लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

 

कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची आता पडताळणी होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसंच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आधारकार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

छाननीत कोणते अर्ज होणार बाद

 

अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांचे अर्ज होणार बाद

 

दोन अर्ज केले असल्यास एक अर्ज बाद होणार

 

दुचाकी, चारचाकी असेल तर अर्ज बाद होणार

 

आधार कार्ड आणि बँक खात्याचं नाव वेगळं असेल तर लाभ मिळणार नाही

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...