राजापूर करक येथे कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबटया लोखंडी तारेच्या खुराड्यात अडकला

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर करक येथे कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबटया लोखंडी तारेच्या खुराड्यात अडकला

राजापुर ( पुरुषोत्तम खंबल प्रतिनिधि )

तालुक्याच्या ग्रामिण भागासह राजापूर शहरात बिबट्याचा वावर वाढलेला असताना येणाऱ्या तक्रारीना वनविभागाकडुन केराची टोपली

राजापूर करक येथे कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबटया लोखंडी तारेच्या खुराड्यात अडकला

राजापूर वनविभाग म्हणजे केवळ झाडतोडीचेच पास ? वनसंपदा नष्ट करण्यासाठीच शासनाने सेवेत घेतले का? सर्वसामान्यांचा सवाल

राजापूर:-

राजापूर तालुक्यातील मौजे करक तांबळवाडी येथील श्री. आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील करक यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनीवरून दिली. ही घटना सोमवारी घडली. सदर बिबट्याला वनविभागाने सुखरुप ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे .

   गेल्या अनेक वर्षापासुन राजापूर तालुक्यातील ग्रामिण भागासह राजापूर शहरातही बिबट्याचा मनुष्यवस्तीकडे राजरोस वावर वाढलेला असताना राजापूर वनविभाग मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन सुसेगाद पहुडलेले आहे . राजापूर शहरासह ग्रामिण भागात अनेक ठिकणी बिबट्याने काहीजणांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत मात्र त्या त्या वेळी वनविभागाचा गलथान कारभारच समोर आलेला होता आहे . नागरिकानी केलेल्या तक्रार अर्जाना आजपर्यनत राजापूर वनविभाग केवळ केराचीच टोपली दाखवण्याचे काम करत असुन झाड तोडीच्या पासाना अग्रक्रम देत आहे . त्यामुळे राजापूर वनविभाग हा फक्त झाड तोडीसाठीच आहे का ? त्याना फक्त कोकणची वनसंपदा नष्ट कर्ण्यासाठीच शासनाने सेवेत घेतले आहे का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकान्मधुन उपस्थित केला जात आहे .

बिबटया अडकल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन प्रथमदर्शी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रिन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेऊन पशुधन विकास अधिकारी राजापूर यांचेकडून तपासणी केली असता, सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुस्थितीत असलेची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी दिली.

ही कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम. प्रियांक लगड , वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा बिबट्या सुस्थितीत असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सदर कामगिरीसाठी रत्नागिरी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे, निलेश म्हादये उपस्थित होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न