पुष्पक एक्स्प्रेस मधुन प्रवाशांच्या उड्या विचित्र जळगाव रेल्वे अपघात.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुष्पक एक्स्प्रेस मधुन प्रवाशांच्या उड्या विचित्र जळगाव रेल्वे अपघात.

????????

आगीची अफवा, ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या; वळणानं घात केला; प्रवास अखेरचा ठरला* 

 

जळगाव- ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची अफवा ११ प्रवाशांसाठी काळ ठरली. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या ११ प्रवाशांचा केवळ एका अफवेमुळे बळी गेला. जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारणारे प्रवासी शेजारच्या ट्रॅकवरुन आलेल्या एक्स्प्रेस खाली आले. एक्स्प्रेसनं चिरडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात भीषण रेल्वे अपघात झाला.

 

घटनास्थळी एक तीव्र वळण असल्यानं पुष्पक एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना बंगळुरु एक्स्प्रेस दिसली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तीव्र वळणावरुन धावणारी बंगळुरु एक्स्प्रेस भरधाव वेगात अचानक आल्यानं प्रवाशांना बाजूला होण्यास वेळच मिळाला नाही. त्यांना हालचाल करण्याची संधीच तीव्र वळणामुळे मिळाली नाही. प्रवासी अचानक दिसल्यानं एक्स्प्रेसच्या लोको पायलटला भरधाव पळणारी ट्रेन थांबवणं शक्य झालं नाही. मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं ब्रेक लावल्यानं चाकांजवळ आगीच्या ठिणग्या उडाल्या. 

 

डब्याला आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. त्यानंतर आग लागल्याची अफवा डब्यात पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या. त्याचवेळी शेजारील ट्रॅकवरुन बंगळुरु एक्स्प्रेस भरधाव वेगात आली. ती कर्नाटकाच्या दिशेनं निघाली होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या टाकलेल्या प्रवाशांना चिरडलं. लखनऊहून मुंबईला जात असलेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून ठिणग्या उडू लागल्या. त्या पाहून प्रवाशांना आग लागल्याचं वाटलं. प्रवासी घाबरले. त्यांनी चेन ओढून ट्रेन थांबवली. 

 

त्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. अनेक प्रवासी शेजारच्याच रुळांवर थांबले. त्यावेळी त्या रुळांवर बंगळुरु एक्स्प्रेस भरधाव वेगात आली. त्या एक्स्प्रेसनं रुळांवरील प्रवाशांना चिरडलं. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. बंगळुरु एक्स्प्रेसच्या धडकेत ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पुष्पक एक्स्प्रेसच्या कोच आणि ब्रेकिंग सिस्टिमच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरु करण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अफवांकडे दुर्लक्ष करा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनमध्येच थांबा, असं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन