🛑 गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल ,गोवळकोट विद्यालयाचे इंटरमिजिएट ग्रेड व एलिमेंटरी परीक्षेत विद्यालयाचा १००% निकाल
🔹 विद्यालयाची यशाची परंपरा कायम
चिपळूण -(योगेश पेढांबकर)
गोवळकोट एज्यूकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालयाचे विद्यार्थी *इंटरमिजिएट ग्रेड व एलिमेंटरी ग्रेड* परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. यामध्ये विद्यालयाचा १००% निकाल लागला आहे.
शासनमान्य कला संचालनालय, मुंबई मार्फत आयोजित चित्रकलेची परीक्षा दरवर्षी आयोजित करण्यात येते. या इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा पाठोपाठ एलिमेंटरी परीक्षेमध्ये सुद्धा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये अनुक्रमे *ग्रेड ‘अ’ श्रेणीमधून* कु.मोहम्मद कलीम तवसाळकर, कु. इफ्रा डबीर, कु. मरियम शेख ,कु. सर्जिला ढेनकर, कु. झैनब भाटकर तसेच *ग्रेड ब श्रेणीमधून* कु.आवेज नाकाडे, कु.सफवान पठाण कु.झैद सय्यद, मंतशा खोत, कु.हुदा खतीब, कु.अनाबिया सुर्वे, कु.हुमेरा मेयर, कु.प्राजक्ता गोवळकर आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या सदर शासकीय होणारा स्पर्धेसाठी विद्यालयातील कलाशिक्षक श्री उदय मांडे यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लागले. व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
शासनमान्य कला संचालनालय मुंबई मार्फत आयोजित चित्रकलेच्या या इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा पाठोपाठ एलिमेंटरी परीक्षेमध्ये ग्रेड अ मधून-१ , ग्रेड ब मधून -३, ग्रेड क मधून-४ असे क्रमांक प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयाचे विद्यमान चेअरमन श्री.डॉ. इसहाक खतीब, व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले, सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर,तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, संस्थेचे सर्व संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. इरफान शेख, विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. उदय मांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Author: Yogesh Pedhambkar
योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी