कोंढेतड कुवळेकरवाडीत श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोंढेतड कुवळेकरवाडीत श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

✍️ राजू सागवेकर | राजापूर

▪️ राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड येथील श्रीगणेश मंदिर देवस्थान, कुवळेकरवाडी मंडळाच्या वतीने यंदाचा श्रीगणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. उत्सव ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न होणार आहे.

✅ ३१ जानेवारी: हळदीकुंकू समारंभ (दुपारी ३ वाजता)
✅ ३१ जानेवारी: खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा (रात्री ८ वाजता)
✅ १ फेब्रुवारी: श्रीगणेश जयंती उत्सव
✅ २ फेब्रुवारी: विहिरीवरील पूजा

कोंढेतड कुवळेकरवाडीत श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

▪️ शुक्रवारी, ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता आयोजित ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून, फक्त ३० स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवीपासून पुढे कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.

🏆 बक्षिसे:
🥇 प्रथम क्रमांक: ₹3,001 + चषक
🥈 द्वितीय क्रमांक: ₹2,001 + चषक
🥉 तृतीय क्रमांक: ₹1,001 + चषक
🎖 उत्तेजनार्थ बक्षिसे: दोन विशेष स्पर्धकांना रोख पारितोषिक.

▪️ स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २९ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी खालील संपर्क साधावा –
📞 मुकुंद सावंत: 9405474944
📞 मुकेश कुवळेकर: 7517064553
📞 प्रकाश शिंदे: 8446341599

▪️ श्रीगणेश मंदिर देवस्थान कुवळेकरवाडी मंडळाने भाविक, नागरिक आणि स्पर्धकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...