पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? सा. रत्नागिरी वार्ताहर 

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना.

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना.

मुंबई:— राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली.

बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी. तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे. चारा उत्पादनासाठी जमीनींची उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे.

विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविताना इतर विभागांचेही सहाय्य घेण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

शेळ्यांमधील देवी/लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावी. राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे.

लाळ खुरकत व पीपीआर प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवावी. बर्ड-फ्ल्यूसारखे रोग पसरू नयेत, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

पशुप्रजनन धोरणात कालानुरुप बदल करणे आवश्यक असून त्यानुसार नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.

तसेच पशुपालन व्यवसायात लोकसहभाग वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था पातळीवर अभियान राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम