शिक्षक प्रभू हंबर्डे व त्यांचे 3 विद्यार्थी यांची जिल्हास्तरीय CS HACKETHON स्पर्धेत गुहागर तालुक्यातून निवड…
गुहागर (वार्ताहर).जि.प.पूर्ण प्राथ.शाळा वेलदूर घरटवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री प्रभू रघुनाथ हंबर्डे व त्यांचे इयत्ता चौथीतील तीन विद्यार्थी यात ऋषभ मंगेश धोपट, विप्लव प्रितेश घरट, राही राजेश आगिवले यांची सी एस हॅकेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ते १० फेब्रूवारी २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय सी एस हॅकेथॉन प्लग्ड उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.
२०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या सी एस हॅकेथॉन प्लग्ड
कार्यक्रमासाठी नोंदणी केलेल्या हजारो सहभागींपैकी निवडलेल्या अंतिम स्पर्धकांमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.गुहागर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. रायचंद गळवे, शिक्षण विस्ताराधिकारी श्री. नामदेव लोहकरे,केंद्रप्रमुख श्रीम. आरोही शिगवण यांनी जिल्हास्तरीय सीएस हॅकेथॉम स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतर्फे शिक्षक प्रभू हंबर्डे व तीनही विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश शिंदे सर,वेलदूर ग्रामपंचायत उपसरपंच मा.श्री.राजू गोपाळ जावळे,वेलदूर गावअध्यक्ष श्री.आरकेश घरट, गाव पाटील श्री.गणपत धोपट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.राजेश धोंडू जावळे.शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा सौ.श्रुती योगेश घरट ,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,शिक्षक किरण सूर्यवंशी सर ,सौ.मानसी जोशी ,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ पदाधिकारी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेची उत्तरोत्तर चांगली प्रगती होत आहे त्या बाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला.