शंकर दादा ठोंबरे क्रिकेट संघ शिवणे(मधलीवाडी)आयोजीत स्व.शंकर दादा ठोंबरे स्मुर्ती चषक २०२५ पर्व ३रे संपन्न.

गुहागर -गुहागर तालुक्यातील शंकर दादा ठोंबरे क्रिकेट संघ शिवणे मधलीवाडी यांच्या विद्धमानाने रविवार दिनांक ९/२/२०२५ रोजी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबई मीरारोड येथील मैदानावर करण्यात आले होते. समाजसेवक स्व. शंकर दादा ठोंबरे यांची आठवण म्हणून गेली तीन वर्ष त्यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचे उदघाट्न सकाळी ८ वाजता क्रिकेट प्रेमी आणि वरिष्ठ मान्यवर तसेच कु. सुमित सदानंद जोशी (गावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण १६ संघांचा समावेश होता तसेच या स्पर्धेत प्रथम क्रमांक रॉयल ११ क्रिकेट संघ (आवरे ) तसेच द्वितीय क्रमांक श्री मानाई देवी क्रिकेट संघ (शिवणे ) आणि तृतीय क्रमांक दे धक्का क्रिकेट संघ (कोळवली ) यांनी पटकावला विजेता संघास रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज- तुषार शितप रॉयल ११ क्रिकेट संघ (आवरे ) उत्कृष्ट गोलंदाज – कौशल गुरुव रॉयल ११ क्रिकेट संघ (आवरे) मालिकावीर – अमित जोशी श्री मानाई देवी क्रिकेट संघ (शिवणे ) हे मानकरी ठरले.
तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेता संघांच्या कर्णधारांना स्पोर्ट्स गॉगल देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच मधलीवाडी महिला मंडळ यासंकडून नाश्ता आणि संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री दीपक गणपत जोशी (मधलीवाडी) यांच्याकडून पाणी व्यवस्था तर कु. वृषभ प्रकाश जोशी (मधलीवाडी) यांच्याकडून चेंडू बॉक्स तसेच कु. संतोष सकपाळ (मंडणगड) यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल देण्यात आले होते.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. स्नेहा सीताराम जोशी आणि अक्षय सुरेश जोशी (मधलीवाडी) यांसकडून,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती अनिता रमेश राणे (देवगड) यांसकडून, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री राकेश शंकर जोशी (खालचीवाडी) यांसकडून तसेच उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक श्री.चिराग चंद्रकांत म्हात्रे (सफाळे) , उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक कु. तन्मय प्रमोद ठाकूर (सफाळे), तर मालिकावीर पारितोषिक कु योगेश कोंडस्कर (गुहागर) यांसकडून देण्यात आले. तसेच या स्पर्धेसाठी पूर्ण दिवसभर पंच म्हणून दुर्गेची कोंडवी असोसिएशनच्या खेळाडूंनी सहकार्य केले
या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेले देणगीदार यांचे ही आभार मानण्यात आले. तसेच दुर्गेची कोंडवी क्रिकेट असोसिएशन पंचक्रोशीने संघ देऊन आयोजकांना मोलाचे सहकार्य केले व उत्तम आयोजन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे ही आभार माणण्यात आले तसेच या स्पर्धेसाठी श्री सुरेश जोशी ,श्री मंगेश जोशी, श्री अजित जोशी, श्री नितीन जोशी , श्री प्रदीप मुदगल, श्री दीपक मुदगल श्री अविनाश मोरे, श्री प्रवीण जोशी, श्री दिलीप शितप, श्री विजय शितप श्री दिपक शितप, श्री अनंत शितप श्री सुजित शितप कु. सुनील शितप श्री सुधीर भुवड यांनी उपस्थितीत राहवून संपूर्ण आयोजक टीमचे कौतुक केले. पंचक्रोशीतील सर्व बांधवांचा एकोपा, संघटन, वैवारिक देवाण – घेवाण या साऱ्या गोष्टी भविष्यात टिकून रहाव्यात व विविध क्षेत्रात विध्यार्थी तसेच खेळाडू पूढे प्रगती करत राहवे यासाठी हा प्रामाणिक हेतू होता, तरी या एकदिवशीय क्रिकेट महासंग्रामाचा व रोमांचक सामन्यांचा लाभ देऊन असे आवाहन शंकर दादा क्रिकेट संघ मधलीवाडी शिवणे यांच्या वतीने करण्यात आले.
त्यानंतर, ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानून या स्पर्धेची सांगता करण्यात आली.
शंकर दादा ठोंबरे क्रिकेट संघ शिवणे(मधलीवाडी)आयोजीत स्व.शंकर दादा ठोंबरे स्मुर्ती चषक २०२५ पर्व ३रे संपन्न.