भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीसपदी सतीश ओहोळ यांची निवड
अहिल्या नगर प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या जिल्हा सरचिटणीस पदी सतीश ओहोळ यांची बहुमताने नालंदा बुद्ध विहार नालेगाव, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या बैठकीत निवड करण्यात आली . यावेळी राष्ट्रीय सचीव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे, राज्य सरचिटणीस अशोक केदारे, राज्य संघटक गौरव पवार आदि मान्यवर उपस्थित होते. सतीश ओहोळ हे सन 1996 पासून संस्थेचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव इत्यादी पदावरती काम केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेने मोठी जबाबदारी दिली आहे.त्यानी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान प्रचारक, राहुल विद्यार्थी वस्तीगृहाचे समन्वय, अशा अनेक सामाजिक संघटनेत काम केलेला आहे.जिल्हयात सामाजिक चळवळीत योगदान देत आहेत. त्यांनी अनेक गरीब कुटूबांना मदतीचा हात देतानाच विवाह प्रसंगगीही मदत केली आहे. श्रीगोंदा येथील राहूल वसतीगृह चालवण्यात येणाऱ्या अडचणी स्वतः सोडवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन ते करीत आहेत. त्यांना याकामी बहुजन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उत्कर्षाताई रूपवते यांचे मार्गदर्शन व खंबीर साथ मिळत आहे.
नंदकुमार बागड़े पाटिल अहिल्यानगर.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.