शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात — महायुतीत ‘कोल्ड वॉर’ची चर्चा रंगली!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात — महायुतीत ‘कोल्ड वॉर’ची चर्चा रंगली! 

 

मुंबई: राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येतेय, असं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे!

 

???? पालकमंत्रिपदावरून वाद!

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट नाराज आहे. हे पद मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार आग्रही भूमिका घेतली असली तरी अद्याप निर्णय लांबणीवर पडला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाच्या काही माजी मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.

 

???? कोल्ड वॉरची चर्चा — पण शिंदे म्हणतात, ‘कूल कूल आहे!’

यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल अंदाजात स्पष्ट केलं —

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध ठंडा ठंडा, कूल कूल आहेत!”

त्यांनी महायुतीत कोणतंही कुरघोडीचं राजकारण नसल्याचं सांगत, अंतर्गत कलहाची चर्चा फेटाळून लावली.

 

⚔️ समांतर कारभारावरही खुलासा!

शिंदेंच्या वैद्यकीय सहाय्य कक्षावरून त्यांच्या ‘समांतर’ कारभाराच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “महायुतीचा अजेंडा फक्त राज्याचा विकास आहे, समांतर सत्ता नाही!”

 

???? गृह विभागाचा निर्णय आणि नाराजी

गृह विभागाने राज्यातील ज्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या जीवाला थेट धोका नाही, त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जणांची सुरक्षा पूर्णपणे काढून टाकण्यात आली, तर काहींना ‘वाय प्लस’ऐवजी फक्त ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.

 

???? शिंदे गटाची नाराजी स्पष्ट!

भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यामागे गृह विभागाने अपुऱ्या पोलिस मनुष्यबळाचं कारण दिलं असलं तरी शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.

✨ महायुतीत खरोखर तणाव आहे का, की हे फक्त राजकीय पेचप्रसंगाचं नवं रूप?

या कुरघोडीच्या राजकारणाचा पुढचा डाव काय असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे! ????

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]