कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची शिक्षा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची शिक्षा

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, राष्ट्रवादी अजित पवार चे आमदार 

नाशिक: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

 

ही कारवाई १९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात झाली असून, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सरकारवाडा पोलीस ठाण्यात १९९७ पासून सुरू होता.

 

कोण होता गुन्हा?

 

१९९५ मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार आरोपी होते, मात्र न्यायालयाने फक्त माणिकराव आणि त्यांच्या भावालाच शिक्षा सुनावली आहे. इतर दोन आरोपींच्या बाबतीत कोणतीही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.

 

राजकीय आणि कायदेशीर परिणाम

 

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागेल किंवा उच्च न्यायालयात अपील करावे लागेल.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची शिक्षा

या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात या प्रकरणाला कोणती दिशा मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...