तळवली येथील श्री सोमनागेश्वराचा उद्यापासून महाशिवरात्र महोत्सव
गुहागर _ (आशिष कर्देकर वार्ताहर): तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 25 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र महोत्सव विविध कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे.
येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वर देवस्थान जागृत देवस्थान असून विविध ठिकाणाहून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो.यावेळीदेखील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी मंगळवार दिनांक 25 रोजी सकाळी 8 ते 12 मंत्रोक्त पूजा,सा.अभिषेक,दुपारी 12 वा.आरती,सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ, आरती त्यानंतर छबिना व सुस्वर भजने,
बुधवार दिनांक 26 रोजी मंत्रोक्त पूजा,अभिषेक, सायंकाळी 4 ते 5 शिवलीलामृत वाचन,सायं.7 ते 9 सुश्राव्य कीर्तन,त्यानंतर आरती व छबिना,रात्री 10.30 वा. नाटक संगीत संशय कल्लोळ
तर गुरुवार दिनांक 27 रोजी मंत्रोक्त पूजा,अभिषेक,दुपारी 12.30 ते 2 महाप्रसाद, रात्रौ 8 ते 9 आरती,छबिना व रात्रौ ठीक 10.30 वाजता झटपट लकी ड्रॉ सोडत व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभू श्री सोमनागेश्वर देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.