राजापूरमध्ये शिवसेना बळकट होणार – आमदार किरण सामंत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूरमध्ये शिवसेना बळकट होणार – आमदार किरण सामंत

राजापूर : “राजन साळवी यांनी योग्य वेळी निर्णय घेतला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. आम्ही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या सोबत यावे म्हणून प्रयत्न केले होते. उदय सामंत यांनी योग्यवेळी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास पुढे गेला,” असे प्रतिपादन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले.

माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षांतर केल्यानंतर पहिल्यांदाच राजापूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांनी भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट केली.

शिवसेनेचा विस्तार आणि विकास प्रकल्पांना गती

“राजन साळवी आणि माझे नाते जुने आहे. पूर्वी आम्ही प्रतिस्पर्धी होतो, पण शत्रू नव्हतो. आता आम्ही एकत्र आल्याने राजापूर-लांजा मतदारसंघात शिवसेना अधिक जोमाने काम करेल. आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपण एकजुटीने जिंकू,” असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

यासोबतच मतदारसंघातील विकासकामांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. “राजापुरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचे हस्तांतरण लवकरच पूर्ण होईल, तसेच येत्या बजेटमध्ये त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. तालुक्यातील २० शाळांचे नूतनीकरण सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल. शिवाय, ४२० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून महावितरणच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

हातात हात घालून काम करू’ – राजन साळवी

माजी आमदार राजन साळवी यांनीही शिवसेनेच्या भविष्यासाठी सहकार्याचे संकेत दिले. “राजकारणात कालचा शत्रू आज मित्र होतो. एकनाथ शिंदे यांनी मला पक्षात येण्यासाठी बोलावले होते, मात्र आता आपल्याला शिवसेनेच्या बळकटीसाठी एकत्र काम करायचे आहे. भूतकाळ विसरून भविष्यातील विकासावर भर देऊया,” असे साळवी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...