पाटपन्हाळे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

तळवली (मंगेश जाधव)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत वाड्‌मय मंडळ व मराठी विभागाच्यावतीने महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महावि‌द्यालयाचे प्राचार्य, डॉ. प्रमोद देसाई, डॉ. प्रसाद भागवत, वाड्‌मय मंडळाच्या अध्यक्षा कु. दिक्षा पवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव व महावि‌द्यालयाचा जी. एस. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

 

यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांचे मराठी व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते उपस्थित सर्व वाड्‌मय मंडळाचे पदाधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. साक्षी पवार व वाड्मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी कवी सुरेश भट यांचे “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” है गीत सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली. कु. प्रणया गावडे हिने प्रास्ताविक करतांना मराठी भाषा गौरव दिवसाचे महत्व सांगताना मराठी भाषेचा उगम ते संत, पंत व शाहीरी काव्याचा आढाव घेत कविवर्य कसुमाग्र यांच्या साहित्याचा परिचय करून दिला.

 

यावेळी प्राचार्य प्रमोद देसाई यांनी मराठी भाषा ही किती समृद्ध भाषा आहे याची विविध दाखले देऊन मराठी भाषा गौरव दिवसाच्या सर्व उपस्थित प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी विद्यार्थ्यांसाठी काव्य, नाट्य व कथा अशा विविध प्रकारच्या अभिवाचनाच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. कु. अदिती कुलकर्णी हीने तिच्या स्वरचित “ख्याती शिवपुत्राची”, “महाराष्ट्र” या कविता सादर केल्या. कु. दिक्षा पवार हीने संकर्ष कऱ्हाडे यांच्या ‘आई मुलाचा संवाद”, “बालपण” कवितांचे अभिवाचन केले तर कु. नुपूर कारेकर हीने पु. ल. देशपांडे यांचे “व्यक्ती आणि वल्ली” यातील हरीतात्याची व्यक्तिरेखेचे अभिवाचन केले. तसेच कु. साक्षी पवार हीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा’ आणि ‘महाराष्ट्र गीत’ यांचे सादरीकरण केले. कु. कीर्ती साळवी हीने “बहुत असोत सुंदर”, रंजित पाष्टे याने एकच राजा”, दीक्षा पवार हीने “जाहली सकाळ”, मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी ‘आमची जात कंची हाया’ है विलास घोगरे लिखित क्रांतिकारी गीत व “हि चाल तुरु तुरु” हे गाणे उपस्थित श्रोत्यांना कोरस देण्यास सांगून सामूहिक पद्धतीने सादर करून सर्वांना वेगळाच आनंद देवून मंत्रमुग्ध केले.

 

काव्य व नाट्य अभिवाचन स्पर्धेत कु अदिती कुलकर्णी (द्वितीय वर्ष कला) हीने प्रथम क्रमांक पटकावला तर कु. दिक्षा पवार (तृतीय वर्ष वाणिज्य) हीने द्वितीय आणि कु. नुपूर कारेकर हीने तृतीय कमांक मिळविला. गीत गायन स्पर्धेत रंजित पाष्टे (द्वितीय वर्ष कला) याने प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. कीर्ती साळवी (प्रथम वर्ष वाणिज्य) हीने द्वितीय आणि कु. दिक्षा पवार (तृतीय वर्ष वाणिज्य) हीने तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धांचे परीक्षण मराठी व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. जालिंदर जाधव, महावि‌द्यालयाचा विद्यार्थी सचिव राज धोपट व वाड्‌मय मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मराठी वाङ्मय मंडळाच्या सर्व पदाधिकारी व प्रतीनिधींनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. अदिती कुलकर्णी हीने केले तर उपस्थित मान्यवर व श्रोतुवर्ग यांचे आभार रंजित पाष्टे याने मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न