ब्रेकिंग! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी अखेर जाळ्यात!..

ब्रेकिंग! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी अखेर जाळ्यात!

 

पुणे – स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी जोरदार मोहीम राबवली होती. अखेर मध्यरात्री गुणाट गावातील ऊसाच्या शेतात लपलेला असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

 

ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम

 

आरोपी गाडे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तब्बल १३ पथके तयार करण्यात आली होती. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की तो गुणाट येथे आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्या परिसराला घेराव घातला. रात्रीच्या अंधारात शोध घेणे कठीण जात होते, मात्र ड्रोनच्या सहाय्याने त्याचा माग काढण्यात आला आणि शेवटी रात्री दीड वाजता त्याला पकडण्यात आले.

 

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका, अखेर अटक!

 

स्वारगेट अत्याचारप्रकरणानंतर आरोपी फरार राहिल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पोलिसांना तपासात अपयश येत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीला शोधून काढले.

 

आज न्यायालयात हजर

 

अटक झाल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

(अधिक मा

हिती लवकरच…)

नवा ट्विस्ट..! मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने

पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या अगोदर मात्र गाडे याने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. गाडेच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

अटक केल्यानंतर गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. तिथं आरोपीची कसून चौकशी केली जात आहे तर पोलीस कोठडीतच गाडे याने टाहो फोडल्याची माहिती मिळते. माझं चुकलंय. मी पापी आहे, असे म्हणत गाडे रडत असल्याचे समोर आले आहे . मी तरूणीवर अत्याचार केलेला नाही. आमचे संबंध सहमतीने झाले, असा दावा देखील गाडे याने पोलिसांसमोर केला, असे सांगण्यात येत आहे. यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

तसेच या प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल केलेले विधानही महत्वपूर्ण ठरत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें