नवी मुंबई -सुरक्षा रक्षकाचे आमरण उपोषण
नवी मुंबई (मंगेश जाधव प्रतिनिधी )- वीस महीने तळोजा येथील आस्थापनेत सुरक्षा रक्षकाची नोकरी केल्यानंतर रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने वृषाल पाटील याला प्रतिक्षा यादीत ठेवले यामुळे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचा भांगळ कारभार उघडकिस आला आहे. या विरोधात सुरक्षा रक्षक वृषाल पाटील यांने २५फेब्रुवारी पासुन आमरण उपोषण केले आहे तळोजा येथील इडीयन आँईल आस्थापणेत फेब्रुवारी २०२३पासुन वृषाल पाटील हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो २०२३मध्ये सुरक्षा रक्षक मंडळातर्फे आस्थापणात तैनात करण्यात येत असल्याचे पञ देण्यात आले होते.