बौद्ध भिक्षुंना अपमानीत केल्याबद्दल बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा जाहिर निषेध –

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बौद्ध भिक्षुंना अपमानीत केल्याबद्दल बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा जाहिर निषेध

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने गुहागर तहसीलदार यांना निवेदन

आबलोली (संदेश कदम) 

बिहार येथील “बोधगया महाबोधी महाविहार ” मुक्तीसाठी बौद्ध भिक्षुंनी शांततामय मार्गाने चालू केलेल्या आंदोलनास बिहार पोलिसांनी अमानुषपणे ओढत नेऊन अपमानीत केले त्यास जबाबदार असणाऱ्या बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करून “बोधगया महाबोधी महाविहार” ब्राम्हणी भिक्षुंच्या ताब्यातून बौद्ध भिक्षुंच्या बौद्ध जनतेच्या ताब्यात द्यावे असे जाहिर निवेदन गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांना बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहार, पटनाचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल महाराष्ट्र राज्य सी. पी. राधाकृष्णन यांना पाठविण्यात आल्या आहेत.

बोधगया , बिहार (भारत) येथील जगातील बौद्धांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेले “बोधगया महाबोधी महाविहार हे जगातील प्रमुख अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ असून जगाच्या कानाकोपऱ्यातील बौद्ध धर्मिय लोक येथे श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी येत असतात तसेच इतर सांप्रदायी लोक, पर्यटकही येथे भेट देण्यासाठी येत असतात ” बोधगया महाबोधी महाविहार ” हे बौध्दांचा वारसा असलेले महाविहार आहे. त्याच्यावर ब्राम्हणांचा कब्जा आहे तेव्हा तात्कालिन बिहार सरकारने बोधगया मंदिर कायदा १९४९(BTMC ACT 1949) मध्ये तशी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. “वारसा बौद्धांचा त्यावर सत्ता मात्र ब्राम्हणांची”, हिंदूची हा अजब न्याय बिहार सरकारने करुन ठेवले आहे. भारत हि बुद्ध भूमी आहे. अशी जागतिक स्तरावर भारताची विशेष ओळख आहे. परदेशी दौरा करताना भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राजकीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना परदेशी दौरे करणारे अभिमानाने सांगतात की, मी बुद्ध भूमीमधून आलो आहे.

हिंदूच्या ताब्यातून महाबोधी महा बुद्ध विहार पुर्णपणे मुक्त करुन त्याचा ताबा बौद्धांकडे द्यावा यासाठी यापूर्वी पू. अनागरिक धर्मपाल यांचेपासून आतापर्यंत बौद्ध धर्मगुरु भिक्षुं गण आणि बौद्ध जनता शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत तर काही भिक्षुं आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचेवर हि वेळ बिहार सरकारने आणली आहे. याला जबाबदार पूर्ण पणे बिहार सरकार आहे. तारीख २८ चे पहाटेला मोठ्या संख्येने उपोषणाला बसलेल्या आमच्या बौद्ध धर्मगुरूंना पोलिसांनी अमानुषपणे ओढत नेऊन अपमानीत केले आहे त्यांना कोठे ठेवले आहे याची माहिती मिळत नाही. आमच्या धर्म गुरुंवर बिहारचे पोलिसांनी जो अमानुषपणे अत्याचार केला आहे त्या बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, (महाराष्ट्र राज्य) या धम्म संघटनेच्या वतीने आंम्ही जाहिर निषेध करीत आहोत

असे जाहीर निवेदन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी या धम्म संघटनेच्या वतीने धम्म संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, उपाध्यक्ष विद्याधर राजाराम कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते,उपकार्याध्यक्ष अनिल सुर्वे, सरचिटणीस सुनिल गमरे, कोषाध्यक्ष वसंत कदम, कार्यकारणी सदस्य संदिप कदम, विभाग अधिकारी गुहागरचे वैभव गमरे, पेवे नं. २ चे विभाग अधिकारी राकेश पवार, विभाग नं. ३ गिमवी चे विभाग अधिकारी मनोज गमरे, विभाग नं. ४ वेळंब चे विभाग अधिकारी सुरेश जाधव, विभाग नं. ५ पिंपरचे विभाग अधिकारी प्रभाकर मोहिते, विभाग नं. ६ शीर चे विभाग अधिकारी सचिन पवार, विभाग नं. ७ कुडली चे विभाग अधिकारी विनोद यादव, भीमसेन सावंत,शशिकांत जाधव, दशरथ पवार यांनी हे निवेदन गुहागर तहसीलदार श्री.परिक्षित पाटील यांना दिले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी -दापोली...
Read More
दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला  जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न  -रत्नागिरी...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी   ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध विरार - संदीप शेमणकर केंद्र व...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
Read More
शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...
Read More
जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल