ई-मेल तक्रारींच्या तातडीने निपटाऱ्यासाठी आदेश
माहिती अधिकार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर यांच्या मागणीनंतर प्रशासनाची तातडीची कार्यवाही
रत्नागिरी वार्ताहर:
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे आढळून आले. तसेच, अर्जदारांना ई-मेल प्राप्त झाल्याची पोहोच दिली जात नसल्याने माहिती अधिकार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर यांनी मा. निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार, पत्र क्र. आस्था 6 श्री. पेढांबकर/ई-मेल पोहोच/2025, दिनांक 04/02/2025 व शासन परिपत्रक क्रमांक GAD-32036/23/2021/GAD (DESK-18), दि.19/04/2024 अन्वये मा. निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
तत्काळ कार्यवाहीसाठी आदेशित अधिकारी:
- तहसीलदार (सर्व तालुके)
- प्रांत अधिकारी
- पोलीस निरीक्षक
- भूमी अभिलेख विभाग
- तसेच इतर सर्व शासकीय आस्थापना
शासकीय कार्यालयांनी ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांचा त्वरित निपटारा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार म्हणून सक्रिय असलेले श्री. योगेश पेढांबकर यांनी मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे निवेदन सादर करून जनहितासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांच्या माहिती अधिकार चळवळीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
– श्री. योगेश पेढांबकर – पत्रकार

Author: Yogesh Pedhambkar
योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी