मनसेच्या वतीने गुहागरमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मनसेच्या वतीने गुहागरमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

मनसेच्या वतीने गुहागरमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने.

आबलोली (संदेश कदम) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने भवानी सभागृह, शृंगारतळी-पालपेणे रोड येथे भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर तसेच मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र पवार, जानवळे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच वैभवी जानवळकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, शेतकरी संघटना गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, अमित खांडेकर, सह संपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, प्रशांत साटले तसेच अपरांत हॉस्पिटल चिपळूण, वालावलकर हॉस्पिटल डेरवण व रेड क्रॉस रत्नागिरी येथील डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

मनसेच्या वतीने सतत जनहिताचे उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात रक्तगट तपासणी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी, कर्करोग तपासणी आदी सेवांचा समावेश होता. तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून आहार व औषधांबाबत मार्गदर्शन केले. मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप देखील करण्यात आले.

या शिबिरात तालुक्यातील विविध समाजघटकांतील रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे सामाजिक एकता आणि लोकसेवेचा एक नवा आदर्श निर्माण झाला.

कार्यक्रमाला गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगिड, तसेच विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार परीक्षित पाटील यांनी मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के