लाडक्या बहिणीसाठी ३६००० कोटींची भरीव तरतूद! महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सादर

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा 2025-26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. “महाराष्ट्र आता थांबणार नाही.. विकास आता लांबणार नाही..” अशा आत्मविश्वासपूर्ण घोषणा देत अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
महत्त्वाच्या घोषणा आणि आर्थिक धोरणे
✅ महिला सक्षमीकरण:
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद.
महिला सबलीकरणासाठी नव्या योजना हाती.
✅ कृषी आणि शेतकरी विकास:
गेल्या वर्षीच्या 3.3% विकास दराच्या पार्श्वभूमीवर कृषी विकास दर 8.7% पर्यंत वाढवला.
सिंचन सुविधा, सौरऊर्जा आणि शेतीपूरक उद्योगांना भरीव निधी.
✅ उद्योग आणि गुंतवणूक:
‘मेक इन महाराष्ट्र’ धोरणांतर्गत ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट.
जागतिक आर्थिक परिषदेमध्ये १५.७२ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
✅ पायाभूत सुविधा आणि वाहतूक:
मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत $३०० बिलियन आणि २०४७ पर्यंत $१.५ ट्रिलियन करण्याचे उद्दीष्ट.
बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प, भुयारी मार्ग यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती.
✅ गृहनिर्माण धोरण:
‘सर्वांसाठी घरे’ या उद्दीष्टासाठी ग्रामीण घरकुलांसाठी १५,००० कोटी आणि शहरी आवास योजनांसाठी ८,१०० कोटींची तरतूद.
✅ सामाजिक विकास आणि डिजिटल भारत:
थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली प्रभावीपणे लागू केली जाणार.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष निधी.
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शेती, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
“हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून, राज्याच्या आर्थिक प्रगतीला गती देणारा दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन करत अजित पवार यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.