कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुका स्तरीय परसबाग स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
राजापूर – संदीप शेमणकर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या
तालुका स्तरावर परसबाग स्पर्धेत राजापूर तालुक्यात कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांकाने विजयी होवून रुपये ५०००/- ( पाच हजार रुपये)चे बक्षिस पटकाविले आहे. खात्यात जमा झाले आहेत.
पूर्व व्यवसाय शिक्षणात ही परस बाग प्रशाला करतच असते.पण प्रशालेने ही परसबाग तालुका स्तरीय स्पर्धेतील एक सहभागी शाळा म्हणून उतरवली होती.
सदर स्पर्धेत परसबागेच्या विविध अटी ठेवलेल्या होत्या.त्यामध्ये बागेचा आराखडा,सेंद्रीय खत निर्मिती,सिंचन पद्धत,विद्यार्थी व पालक सहभाग,लोक सहभाग,देशी भाज्यांचे वाण ( जाती )भाज्यांची विविधता तसेच पिकविलेल्या भाज्यांचा पोषण आहारात उपयोग आणि पिकविलेल्या भाज्यांची विक्री अशा विविध निकष व अटींमधून प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावून तालुक्यात प्रशालेचे नांव नेहमी प्रमाणे उज्ज्वल केले आहे.
प्रशालेने तयार केलेल्या १०० x ८० फूट परसबागेला पूर्णपणे सौर ऊर्जेच्या तारांचे विदयुत कुंपण असून पूर्ण शेतात तुषार शिंचनाचे एकूण ८० पॉईंट बसविलेले आहेत.सभोवार नेट ने बाग बंदिस्त केलेली आहे.
ह्या मध्ये ५० x ८० भागात कलिंगड लागवड तर उरलेल्या ५० x ८० भागात लाल माठ,मूळा भाजी, मेथी,गवार,भेंडी तसेच चारही बाजूला कडेने हरभरा अशा देशी वाण असलेल्या भाज्यांची लागवड केली होती.शेतात पिकलेल्या भाज्यांचा उपयोग प्रशालेतील मुलांच्या पोषण आहारात कायमच केला जातो. व उरलेली भाजी स्थानिक पातळीवर विकली जाते.यासाठी लागणारे सेंद्रिय खत (गांडूळ खत )हे सुद्धा शाळेतील टाकाऊ पदार्थांतून विद्यार्थी स्वतः तयार करतात व विकतात ही
हा सर्व उपक्रम प्रशालेतील पूर्व व्यवसाय शिक्षण या अभ्यासक्रमातून केला जातो.हा विभाग प्रशालेतील शिक्षक कोकरे सर हे उत्तमरित्या पाहतात.पूर्व व्यवसाय शिक्षणातील शेती विभाग हा निलम नितीन साळवी या पाहतात.त्यांत त्यांना इतर तीन विभागाचे निर्देशक प्रविण आंबेलकर सर,अमूल पोकले सर, अश्विनी राणे मॅडम,शिपाई महाले काका व समस्त विद्यार्थी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभते.
आज धाऊलवल्ली ग्राम विकास मंडळ,मुंबई यांनी हे व्यवसाय शिक्षण घेवून विद्यार्थ्यांना नुसते शिक्षणाभिमुख न करता व्यवसायभिमुख करून एक नवी दिशा दाखवीली आहे.या शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थी आज आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार ही लावत आहेत.
या यशामुळे गोखले विदयालय, धाऊलवल्ली संस्थेचे,प्रशालेचे,मुख्याध्यापिका, विभाग प्रमुख, निर्देशक, विद्यार्थ्यांचे व समस्त कर्मचारी वृंदाचे नांव आज पंचक्रोशितच नव्हे तर तालुका, जिल्हा स्तरावर गाजत आहे.