तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा शिमगोत्सव १३ मार्चपासून सुरू..

तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा शिमगोत्सव १३ मार्चपासून सुरू

 

गुहागर (आशिष कर्देकर प्रतिनिधी)

तालुक्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवी यांच्या शिमगोत्सवाला गुरुवार, १३ मार्चपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशात कार्यरत असलेले चाकरमानी आवर्जून हजेरी लावतात.

ग्रामदेवतेच्या पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी सहाणेवर आणण्याची प्रथा मोठ्या जल्लोषात पार पडते. यावेळी आंब्याचे झाड (माडवळ) देवीच्या पालखीसोबत नाचवत आणण्याचा अनोखा विधीही होतो.

शिमगोत्सवाच्या काळात श्री सुकाई देवी आणि पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता श्री झोलाई देवी यांची पालखी भेट हा सोहळा विशेष आकर्षण असतो. या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

शिमगोत्सव कार्यक्रम (१३ ते ३० मार्च)

१३ मार्च – पालखी मिरवणूक

१४ मार्च – सहाण भरणे

१५ मार्च – मानकरी घरे घेणे

१६ मार्च – शिगवणवाडी व रेडीज मंडळी घरे घेणे

१७ मार्च – पालखी बैठी (सहाण/ब्राह्मणवाडी)

१८ मार्च – पालखी बैठी

१९ मार्च – भेळेवाडी

२० मार्च – भडकंबावाडी

२१ मार्च – आगरवाडी नं. १

२२ मार्च – देऊळवाडी

२३ मार्च – आगरवाडी पूर्व

२४ मार्च – श्री सुकाई देवी व श्री झोलाई देवी पालखी भेट सोहळा

२५ मार्च – डावलवाडी

२६ मार्च – सावंतवाडी

२७ मार्च – चिंचवाडी

२८ मार्च – देवीचा गोंधळ

२९ मार्च – पालखी क्षेत्रफाळ

३० मार्च – गुढीपाडव्याला मंदिरात जाऊन शिमगोत्सवाची सांगता

 

या भव्य शिमगोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण आणि सचिव प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें