होळी स्पेशल बसला उत्तम प्रतिसाद – ठाणे-कुडली बंदरवाडी मार्गावरील सर्व सीट फुल!
आबलोली – ठाणे ते कुडली बंदरवाडी या होळी स्पेशल गाडीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. 12 मार्च आणि 13 मार्च रोजी धावणाऱ्या दोन्ही बसमधील सर्व सीट आधीच बुक होऊन फुल झाल्या आहेत.
या यशस्वी प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानत गुहागर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी पुढेही ही बस सेवा कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यामुळे ठाणे व परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यातही ही सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.
???? ???? ही पण बातमी वाचा.Click करा ????
????ऑनलाइन ST तिकीट बुकिंग करण्यासाठी ???? क्लिक करा ????