शिवसेना जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांच्या मोफत रूग्णवाहिकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या कडुन रूचिता नाईक यांच्या कार्याचे कौतुक
नालासोपारा संदीप शेमणकर
दिनांक ९ मार्च २०२५ रोजी.शिवसेना जिल्हाप्रमुख (ग्रा.त.निवारण कक्ष) सौ.रूचिता नाईक यांनी सुरू केलेल्या मोफत रूग्णवाहिकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ससाहेब यांनी भेट देत रूचिता नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले.
मोफत रूग्णवाहीकेने अनेक रूग्णांचे प्राण वाचवले असुन सर्वस्तरावर या मोफत रूग्णवाहिकेचे कौतुक होत आहे.
रूग्णांना शस्त्रक्रियासाठी उपचारासाठी रूग्णालयात जाण्यासाठी मोफत रूग्णवाहिका सेवा देण्यात येते.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र रांजणे , उपशहरप्रमुख श्रीकांत जाधव, विभाग संघटीका जया गुप्ता व संतोष कांबळे उपस्थित होते.