केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मोठी घोषणा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मोठी घोषणा

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात मोठी घोषणा झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी 400 कोटी रुपयांचं भव्य गिफ्ट जाहीर केलं. मुंबईत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) उभारण्यात येणार असून, हे संस्थान आयआयटीच्या धर्तीवर विकसित होणार आहे. यासाठी गोरगाव फिल्मसिटीमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे.

IICT म्हणजे काय?

IICT म्हणजे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, जिथे कंटेंट क्रिएशन, डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण आणि संशोधनाला चालना दिली जाईल. केंद्र सरकार यासाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गडचिरोली बनेल भारताची स्टील सिटी!

याच बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला माईनिंग हब म्हणून विकसित करण्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारने पोलाद क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून, गडचिरोली भविष्यात भारताची स्टील सिटी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर विमानतळाच्या विकासाला गती

बैठकीत नागपूर विमानतळाच्या विस्तारासंदर्भातही चर्चा झाली. या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे विमानतळाचे काम लवकरच वेग घेईल.

मुंबईत भव्य जागतिक समिट

मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान “वर्ल्ड ऑडिओ, व्हिज्युअल अँड एन्टरटेनमेंट समिट” आयोजित करण्यात येणार आहे. या समिटच्या आयोजनाची संधी महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी!

मुख्यमंत्री फडणवीस यांची ही दिल्लीवारी महाराष्ट्रासाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरली. IICT सारखी भव्य संस्था, गडचिरोलीच्या विकासासाठी केंद्राचे सहकार्य आणि नागपूर विमानतळ प्रकल्पाला गती या सगळ्या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला

मोठी चालना मिळणार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न