वेलदूर उर्दू शाळेचे प्रद्याशोध (RTS) परिक्षेत यश
गुहागर – दिनांक 07/03/2025 रोजी झालेल्या केंद्रस्तरीय परीक्षेत जि.प.वेलदूर उर्दू शाळेने यश संपादन केले आहे.शाळेतील दोन विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरीय निवड परीक्षेसाठी झाली आहे.यामध्ये १) उमर इम्रान पंची २) हुदा नदीम पंची यांनी उर्दू माध्यमातून तालुक्यातून उर्दू माध्यमातून यश संपादन केले आहे.एकूण तीन विद्यार्थी उर्दू माध्यमातून निवडले गेले त्यापैकी दोन विद्यार्थी वेलदूर उर्दू शाळेचे आहेत.यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांना मार्गदर्शन शाळेच्या शिक्षिका चितापुरे मॅडम यांनी केले आहे.विद्यार्थ्यानी मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे व पुढील तालुकास्तरीय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.