कुडली नं. 3 शाळेचा जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून झाला कायापालट

गुहागर (सुजित सुर्वे) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. 3 या शाळेची छप्पर नादुरुस्त झाले होते कोणत्याही क्षणी कोसळेल अशी अवस्था झालेली होती. शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक श्री सुहास गायकवाड सर,सौ.प्रमोदनी गायकवाड मॅडम, श्री संदेश सावंत सर,श्री गणेश वायचाळ सर व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी शासनाकडे अर्ज करून छप्पर दुरुस्त होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु काहीच भाग दुरुस्त झाला व धोकादायक भाग तसाच शिल्लक राहिला. शेवटी जिंदाल कंपनीचे अधिकारी शाळेला भेट द्यायला आले तेव्हा प्राप्त परिस्थितीचा लेखाजोखा अधिकाऱ्यांसमोर मांडला सत्य परिस्थिती विचारात घेता मुलांच्या दृष्टीने धोकादायक झालेली इमारत लवकरात लवकर दुरुस्त होणे गरजेचे आहे. हा विचार करून जिंदाल कंपनीच्या jsw फाउंडेशन चिपळूण यांनी शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सात लाख रुपये रक्कम मंजूर केली. या रकमेतून उत्कृष्ट दर्जाचे लोखंड आणि उत्कृष्ट दर्जाचा पत्रा वापरून शाळेला भविष्यामध्ये कोणताही धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारची इमारत तयार करून दिली. शाळेच्या समोर स्वच्छता ग्रहावर एक शेड किचन शेड समोर एक शेड आणि टाकीवर एक शेड अशा तीन शेड शाळेला तयार करून दिल्या. अतिशय दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या शाळेचा कायापालट करण्याचे काम जिंदाल कंपनीने केले.या कामासाठी विशेष सहकार्य लाभले ते श्री.वैभव संसारे सर JPTL Manger, या गावाचे सुपुत्र श्री.मनीष किल्लेकर JPTL Ass.इंजिनियर ,
श्री.अनिल ददीज सर CSR Hed,
श्री.मयूर पिंपळे प्रोजेक्ट मॅनेजर,
श्री. भूषण दळवी CO, श्री.कल्पेश गडदे इंजिनियर,
तत्कालीन मुख्याध्यापक श्री. सुहास गायकवाड सर,सध्याचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत सर, पदवीधर शिक्षक श्री गणेश पाडवी, उपशिक्षक श्री.महेश खारतोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजेश वनये, उपाध्यक्षा सौ. संजीवनी थोरसे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य . या सर्वांचे कुडली माटलवाडी ग्रामस्थांनी खूप खूप आभार मानले. विशेषतः जिंदाल कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उत्तम दर्जाचे काम केल्याबद्दल तोंड भरून कौतुक केले.