माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम शाळेत आरोग्य शिबीर संपन्न

माणगाव – संदीप शेमणकर
माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम शाळेत, उषा साई एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, देवघर ता. म्हसळा आणि एम.जी.एम. हॉस्पिटल, पनवेल तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य शिबिर सोमवार, दि. १० मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी सुमारे ४४७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदरच्या शिबिरास संस्थेच्या अध्यक्षा कविता उषा शांताराम तांबे यांच्या प्रयत्नामुळेच प्रथमच वनवासी कल्याण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजीत कारणे शक्य झाले.
या शिबिरास श्री. सुनील साळुंखे (निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, अलिबाग, रायगड), यांच्या सहकाऱ्याने तसेच, संस्थेच्या अध्यक्षा कविता उषा शांताराम तांबे ,संदेश देसाई, श्वेता साळवी,सचिन अडसुळे,चैतन्य साळुंखे, नीलेश तेलंगे, इब्राहिम करेल आणि सहकारी तसेच एम.जी.एम.हॉस्पिटल स्टाफ यांच्या सहकार्याने माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम शाळेत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना तज्ज्ञ डॉक्टर.हॉस्पिटल, पनवेल यांची वैद्यकीय टीम उपस्थित होती. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व आभार व्यक्त करण्यात आले.