१८ मार्च रोजी शिमगोत्सव सणानिमित्त गुहागर तालुक्यातील खोडदे (सहानवाडी)येथील आई इच्छापूर्ती श्री. नवलाई देवीच्या सहाणेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
खोडदे गावातील जेष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

.कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद, ता. जि. रत्नागिरी यांच्या नमानाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे – मुंबई या मंडळाचा शिमगोत्सवा निमित्त स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम).
गुहागर तालुक्यातील खोडदे येथील श्री. नवलाईदेवीच्या सहाणेवर होलिकोत्सव, शिमगोत्सव २०२५ या उत्सवा निमित्ताने खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे मुंबई या मंडळाच्या वतीने खोडदे गावातील (वय वर्ष ७५ पासून पुढे) जेष्ठ नागरिकांचा, माता, पिता, बंधू यांना मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ रोजी रात्रौ १० वाजता एका छताखाली आणून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे, सन्मानित करण्यात येणार आहे हा गौरव सोहळा, सन्मान सोहळा पार पडल्या नंतर आई इच्छापुर्ती नवलाईदेवी देवस्थान खोडदे सहानवाडी खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने रात्रौ १०:३० वाजता श्री. कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद, ता. जि. रत्नागिरी यांचे लोकप्रिय बहुरंगी, बहूढंगी नमन सादर करण्यात येणार असून नव्या शैलीतील तालबद्ध खेळे, नविन गाणी आणि वगनाट्य सादर करण्यात येणार आहे तरी या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे गावातील आणि खोडदे पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन खोडदे ग्रामस्थ मंडळ खोडदे मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.