भाजपकडून विधानपरिषद उपचुनावासाठी उमेदवार जाहीर!
मुंबई – भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपचुनावासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती निवडणूक समितीने खालील तीन उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे –
✅ श्री संदीप दिवाकरराव जोशी
✅ श्री संजय किशनराव केणेकर
✅ श्री दादाराव यादवराव केचे
भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी ही नावे अधिकृतरीत्या घोषित केली आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या उमेदवारीची मोठी चर्चा असून, येत्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. आता या उमेदवारांचा सामना कोणत्या पक्षांकडून होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.