शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जि.प. पडवे गटाच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
सस्नेह जय महाराष्ट्र !
या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात येईल, तसेच प्रेरणादायी विचारांवर मार्गदर्शन होईल. शिवसंपर्क, शिवस्पंदन आणि शिवसेनेची एकजूट दाखवणारा हा सोहळा शिवसैनिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
गुहागर ( सुजित सुर्वे)….
जय महाराष्ट्र!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जि.प. पडवे गटाच्या वतीने यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. सोमवार, दि. १७ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता तिथीप्रमाणे हा सोहळा संपन्न होणार आहे.
हा सोहळा श्री. संदीप सदानंद निमुणकर, शाखाप्रमुख आबलोली यांच्या बाजारपेठेतील निवासस्थानी मोठ्या जल्लोषात आणि शिवप्रेमाने संपन्न होईल. गटातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे.
या सोहळ्यात शिवरायांच्या गाथेचा जागर, अभिवादन कार्यक्रम आणि विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची महती पटवून देण्यासाठी या सोहळ्यात मान्यवरांचे मार्गदर्शन आणि उत्साही वातावरण असेल.
या भव्य सोहळ्याचे आयोजन पुढील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे:
✅ श्री. रविंद्र आंबेकर (विभागप्रमुख, जि.प. पडवे गट)
✅ श्री. शरद साळवी (उपविभाग प्रमुख, पं.स. खोडदे गण)
✅ श्री. बाबाशेठ उर्फ विजय वैद्य (उपविभाग प्रमुख, पं.स. पडवे गण)
सर्व शिवसैनिकांनी हा उत्सव मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करावे!
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!