फेरफार नोंदणी ऑनलाईन होणार
ग्रामस्थांना मिळणार दिलासा
नागरिकांकडून ऑफलाइन अर्ज दाखल केले जातात.असे अर्ज ऑनलाईन स्वरूपात दाखल करून घ्या आणि पुढील कार्यवाही करा,अशा सूचना कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.नागरिकांना ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकांना ऑन लाइनद्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा फारशी माहिती नसते त्यामुळे ते लिखित स्वरूपातअर्ज तलाठ्यांकडे देतात.मात्र अनेक दिवस त्यावर कार्यवाही न झाल्याने नागरिकांना ती सुविधा उपलब्ध होत नाही.
तसेच त्या अर्जाबाबत विलंब झाल्यास ऑनलाइन नोंद नसल्याने वरिष्ठांना संबंधितावर कारवाई करता येत नाही. ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफाराची शंभर टक्के अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. वारस नोंद,मृताचे नाव कमी करणे, बोजा नोंद करणे आदी सुविधांची आता ऑनलाईन कार्यवाही होणार असल्याने ग्रामस्थाना दिलासा मिळणार आहे.
ई-हक्क प्रणालीद्वारे सुविधा खालील प्रमाणे
ई-करार नोद,बोजा चढविणे, गहाणखत,बोजा कमी करणे, वारस नोंद, मृतांचे नाव कमी करणे,अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे,एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे,विश्वस्तांची नावे बदलणे,खातेदाराची माहिती भरणे,हस्तलिखित व संगणकी कृत तफावत संबंधीचे अर्ज, मयत कुळाची वारस नोंद १०० टक्के अमंलबजावणी होण्या साठी ऑनलाईन द्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे.तालुका पातळीवरील तलाठ्यां पासून प्रांतधिकाऱ्यांना ई-हक्क प्रणालीच्या अंमल बजावणीचे आदेश दिले आहेत.