इंजि. डी. आर. शेंडगे यांचा प्राथमिक शाळा, निमगाव घाणा येथे सत्कार
निमगाव घाणा (ता. जिल्हा अहिल्या नगर) – प्राथमिक शाळा निमगाव घाणा येथे कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उपलब्ध करून दिल्याबद्दल इंजि. डी. आर. शेंडगे यांचा शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेस विजेची समस्या भासत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करून दिला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळणार असून शैक्षणिक उपक्रम अधिक सुलभ होतील.
या कार्यक्रमाला सरपंच सुरेश रूपनर, सौ. उषाताई शेंडगे, मुख्याध्यापक शिंदे, शिक्षिका सौ. पाटील, सौ. गवळीकर, सौ. खराडे, राहिबाई शेंडगे, गणेश रूपनर, अक्षय धायगुडे, योगेश बाचकर यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंजि. शेंडगे यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
पत्रकार – नंदकुमार बगाडेपाटील.