पंचायत समिती गुहागर आयोजित ब्लेंडेड पी एल सी प्रशिक्षण वर्गाची यशस्वी सांगता

गुहागर – पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग आयोजित मराठी, गणित ,विज्ञान ,समाजशास्त्र, इंग्रजी या विषयाकरिता आयोजित पी एल सी ब्लेंडेड प्रशिक्षण वर्गाची यशस्वी सांगता झाली.सदर प्रशिक्षण माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कोंड शिंगारी येथे आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी तज्ञ मार्गदर्शक प्रताप देसले, गुहागर हायस्कूलचे जाधव सर ,पालपेणे हायस्कूलचे मोहिते सर ,विषय शिक्षिका अश्विनी मोहिते मॅडम ,सुधीर कांबळे, मनोज पाटील ,किन्होळकर सर, सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.त्यावेळी मार्गदर्शन करताना तज्ञ मार्गदर्शक श्री प्रताप देसले म्हणाले की पी एल सी ब्लेंडेड कोर्समुळे शिक्षकांच्या व्यवसायिक दर्जामध्ये वाढ होणार आहे .सदर प्रशिक्षण सर्व शिक्षकांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीत उपलब्ध झालेले आहे .शिक्षकांच्या व्यावसायिक गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची प्रभावी अंमलबजावणी होत असून विद्यार्थ्यांना वैश्विक नागरिक घडवण्याचे ध्येय आपल्यासमोर आहे .शिक्षक हे राष्ट्राचे शिल्पकार असून त्यांची व्यवसायिक गुणवत्तेत वाढ होत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे .त्यावेळी सर्व प्रशिक्षणार्थ्या नी गट चर्चेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व विविध प्रात्यक्षिक कार्य केले.त्याचे सादरीकरण तज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले .गुहागर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे पी एल सी नियोजन करण्यात आले. अशा प्रकारची प्रशिक्षणे वेळोवेळी आयोजित करावेत अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले