खोडदे गावचे माजी पोलिस पाटील रमाकांत साळवी यांच्या ऐकाहत्तरी जन्म सोहळ्या निमित्त.
२३ मार्च रोजी शैक्षणिक सामाजिक, धार्मिक विविध कार्यक्रमांचे आयोजन
रमाकांत साळवी मित्र मंडळ, कोकणी ग्रुप खोडदे,श्री.गजानन होतकरु संघ खोडदे देऊळवाडी यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे माजी सरपंच श्री. रमाकांत विष्णू साळवी यांचा ऐकाहत्तरी जन्मदिन सोहळा रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी ०७:०० वाजता शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून रमाकांत साळवी मित्र मंडळ, साळवी परिवार, आप्तेष्ट आणि श्री. गजानन होतकरु संघ खोडदे देऊळवाडी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे
यानिमित्ताने रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता कोकणी ग्रुप खोडदे यांचे सौजन्याने माजी पोलिस पाटील रमाकांत विष्णू साळवी यांची वह्या तुला, साखर तुला व जल तुला हा कार्यक्रम संपन्न झाल्यावर मान्यवरांचे स्वागत त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात येईल त्यानंतर सांयकाळी ०७:०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर ०८:०० ते ०९:३० वाजता उपस्थित सर्वांसाठी
स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून रात्रौ ११:०० वाजता श्री. रमाकांत साळवी मित्र मंडळ यांचे सौजन्याने देवरुख कोल्हेवाडी येथील श्री. सोळजाई नाट्य नमन मंडळ यांचे बहुरंगी बहूढंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात लहान मुलांसाठी खास मिकी माऊसचे आकर्षण ठेवण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित आदवडे हे करणार आहेत