शिंपी समाजासाठी काहीतरी चांगलं घडतंय याचा प्रत्येक समाज बांधवाना आनंद होणार आहे…!_
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील स्मारक बांधणीसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून हालचालीना वेग…
सोलापूर :-
{स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय}
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील बहुप्रतिक्षित अशा श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारक बांधणी नियोजनासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांच्यासमवेत अत्यंत सुखद व सकारात्मक अशी चर्चा समाज बांधवांसमवेत झाली. मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीत श्रीसंत नामदेव शिंपी समाजातील विविध संस्थेतील पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव एकसंघचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री महेशजी ढवळे साहेब,श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेशजी उंडाळे,
नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजयजी नेवासकर,संत नामदेव विठ्ठल मंदिरातील विश्वस्त महेशजी रेळेकर,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रथमेश परांडकर,नामदेव शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवराज चुंबळकर, दैनिक दिव्य मराठीचे सहाय्यक व्यवस्थापक राजेश केकडे, गुरुनाथ पतंगे, दास पतंगे, अनिल बोंडगे,धनंजय गोंदकर, नंदकुमार कोसबतवार, नामदेव जवंजाळ, अनंत घम यांच्यासह इतर जिल्ह्यातून आलेले सर्व समाज बांधव उपस्थित होते.
पंढरपूरात आकर्षक व सुंदर पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी शासनाकडून तब्बल 15 कोटीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. शिवाय तेथील रेल्वे प्रशासनाकडून जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मारक बांधणीसाठी तात्काळ व यथायोग्य नियोजन करून व गरज पडल्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
खरंच… समाजासाठी काहीतरी चांगलं घडतंय हे पाहुन एक समाज बांधव म्हणून मनोमन आनंद होतोय….
जय श्री नामदेव!
श्री.राजेश केकडे
सोलापूर.