उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षा केंद्रामध्ये शंभर टक्के उपस्थिती

गुहागर – जिल्हा परिषद पुणे प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन परीक्षा संपन्न झाली.परीक्षा केंद्रामध्ये शंभर टक्के परीक्षार्थी प्रविष्ट झाले .त्यावेळी केंद्र संचालक मनोज पाटील, शिक्षण तज्ञ सदस्य शंकर कोळथरकर ,पर्यवेक्षिका सुषमा गायकवाड ,अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे ,अफसाना मुल्ला उपस्थित होते.परीक्षेच्या पूर्वी सर्व परीक्षार्थींचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले .वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये नव साक्षर करिता असणारे वर्ग नियमित सुरू असून आज राज्यभर परीक्षा सुरू आहे .सदर परीक्षेमध्ये वेलदूर नवानगर मराठी शाळेतील , नव साक्षरांकरिता असणाऱ्या परीक्षा केंद्राचा निकाल शंभर टक्के लागेल असा विश्वास मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी व्यक्त केला .परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सुषमा गायकवाड व सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators