राजापुर -पडवे गावातील बीएसएनएल टॉवरवरील केबल चोरी – पोलिसांना चोरांचा तपास लावण्यात अपयश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापुर -पडवे गावातील बीएसएनएल टॉवरवरील केबल चोरी – पोलिसांना चोरांचा तपास लावण्यात अपयश

राजापूर तालुक्यातील पडवे गावात नुकताच कार्यान्वित झालेल्या बीएसएनएल टॉवरमधून अज्ञात चोरट्यांनी जमिनीतून केबल चोरी करून पलायन केले. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, यापूर्वीही या भागात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत काही स्थानिक गॅरेज चालकांच्या गाड्या चोरीला गेल्या असून, काही ठिकाणी दागिन्यांच्या चोरीच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, अद्यापही या चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

गावातील सुरक्षेच्या दृष्टीने काही नागरिकांनी फेरीवाले, भंगार व्यावसायिक आणि इतर अनोळखी लोकांना ग्रामपंचायतीत आधार कार्डासह नोंदणी करूनच व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. गावातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता घ्यावी आणि या चोरीच्या घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...