स्वामी जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वामी जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर

स्वामी जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर

गणेश क्रीडा मंडळाची २३ वर्षांची निस्वार्थ समाजसेवेची परंपरा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेश क्रीडा मंडळ आणि ओम काळभैरव चॅरिटेबल फाऊंडेशन, गॅलेक्सी हॉस्पीटल, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन शनिवार, दिनांक २९ मार्च २०२५ रोजी टाटा मिल्स कंपाऊंड, परेल येथे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ई.सी.जी., डायबिटीस, ब्लड प्रेशर, नेत्र चिकित्सा तसेच हृदयरोग, नेत्ररोग, मूत्रपिंड आणि ऑर्थोपेडीक विभागातील तपासण्या करण्यात आल्या. तसेच या शिबिरात गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वितरणही करण्यात आले. ओम काळभैरव चॅरिटेबल फाऊंडेशन गेल्या ६ वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असून आतापर्यंत १०० हून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करून ११,००० हून अधिक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

शिबिरात सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मिनी संगनेरिया यांनी महिलांना कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून तपासणी केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली शेलार, विजय कक्कड यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच ओम काळभैरव चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र वोरा, खजिनदार कांतीलाल वाढेल आणि समाजसेवक देवेंद्र मादेसर यांच्या प्रयत्नांसह गॅलेक्सी हॉस्पीटल, वडाळा येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बहुमूल्य सहभाग लाभला.

प्रतिक्षा पंकज फाटक, वैशाली साहा, अनुराधा शेंडे, जयवंती भोसले तसेच गणेश क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश क्रीडा मंडळ, टाटा मिल्स कंपाऊंड, परेल यांचे प्रमुख पदाधिकारी देवेंद्र केळुस्कर, कमलाकर केळुस्कर, पंकज फाटक, सुनिल अडसूळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. गणेश क्रीडा मंडळाच्या २३ वर्षांच्या सामाजिक कार्याचा हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. रहिवाशांचा मिळालेला भरभरून प्रतिसाद हीच या सेवेची खरी पावती आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

💠 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना! ### ✅ राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ नोव्हेंबर २००५...
Read More
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान

तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान “अधिकारी खिशात आहेत” म्हणत धमक्या; गंभीर आरोपांनंतरही ठोस कारवाई नाही, पालक संतप्त...
Read More
तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण आबलोली (संदेश कदम)  कोकणातलं पर्यटन अनेकांना आवडतं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हेच...
Read More
बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश वैभववाडी तालुक्यात राजकीय भूकंप: जिल्हा परिषद उमेदवार आणि...
Read More
सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १६व्या सामन्यात राजस्थान...
Read More
सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात