राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त

आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

मुंबई : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आक्षेपार्ह जाहिराती आणि मिसब्रँडेड औषधांविरोधात मोठी धडक मोहीम राबवत सात जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

‘औषधे व जादूटोणा विरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली असून, राज्यभरातील भ्रामक जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. “भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे तसेच अवैध औषध उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

एफडीएने नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही भ्रामक जाहिरातींना बळी न पडता स्वतःच्या मनाने औषधांचे सेवन करू नये. सेल्फ मेडिकेशनमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. संशयास्पद औषध किंवा जाहिरातींबाबत प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रार प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून, नागरिकांसाठी टोल-फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे. औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने एफडीएकडे तक्रार करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या सर्व तक्रारींची गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सह आयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी दिली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

■ *बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन* ■ *काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली...
Read More
बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा   काँग्रेस 8, शिवसेना (उबाठा) 4...
Read More
विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात महायुतीत अनिकेत तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवरून...
Read More
कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे...
Read More
राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त  आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे माहिती...
Read More
केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याबाबतची वस्तुस्थिती समोर; राज्य संरक्षित...
Read More
गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह   रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रामपंचायत...
Read More
फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.   लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण- परिसरातील तब्बल...
Read More

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी रत्नागिरी, दिनांक २८...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी  सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी तामिळनाडू पोलिस दलात पोलीस अधीक्षक पदाची धुरा; अहिल्यानगर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण...
Read More
संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी