जिल्हा परिषद गटनिहाय दौऱ्यात तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांना उस्फुर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद गटनिहाय दौऱ्यात तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांना उस्फुर्त प्रतिसाद

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री. शेखर घोसाळे यांच्या जिल्हा परिषद गटनिहाय गाव भेट दौऱ्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संघटनेत नवचैतन्य निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

banner

श्री. घोसाळे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी देऊन संघटना बळकटीकरणासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावस जिल्हा परिषद गटातील गावखडी, पूर्णगड, मेर्वी, शिवार आंबेरे, गावडे आंबेरे, डोर्ले, पावस, नाखरे या गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.

या दौऱ्यात तालुका संघटक श्री. सुभाष पावसकर, युवासेना तालुकाधिकारी व शहर संघटक श्री. प्रसाद सावंत, विभाग प्रमुख श्री. किरण तोडणकर, तसेच मयुरेश्वर पाटील उपस्थित होते. पक्षबांधणीसाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उर्जेचा संचार झाला असून आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...