जैतापूर आगरवाडीच्या श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जैतापूर आगरवाडीच्या श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा होणार

banner

✍️राजू सागवेकर

▪️राजापूर तालुक्यातील आगरवाडी येथील श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. हा पवित्र उत्सव येत्या ६ एप्रिल रोजी, रविवारी संपन्न होणार असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
▪️ रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळी १० वाजता रत्नागिरी येथील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. यश संदेश सोवनी यांचे सुश्राव्य रामजन्म कीर्तन होणार आहे. त्यानंतर श्रीराम जन्मानंतर विशेष दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या शुभप्रसंगी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण देखील होणार आहे.
▪️ मंदिर विश्वस्त श्री. नळेकर बंधू आणि आगरवाडी उन्नती मंडळाच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्तांना या पावन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...