नेहा निवाते व वेदिका चव्हाण यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नेहा निवाते व वेदिका चव्हाण यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

banner

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे च यश.

 

आबलोली (संदेश कदम) – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नेहा संदीप निवाते हिने १११ गुण मिळवत रत्नागिरी जिल्ह्यात १९वा क्रमांक मिळवला, तर वेदिका उदय चव्हाण हिने १०१ गुणांसह ४७वा क्रमांक पटकावला. दोघींनाही एनएमएमएस शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

 

दरम्यान, गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाच्या तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत प्राथमिक गटात कस्तुरी संतोष घाणेकर व स्वरा सुदेश जाधव, तर माध्यमिक गटात समृध्दी सुरेश आंबेकर व मृण्मयी दत्ताराम जाधव यांनी सहभाग नोंदवला.

 

यशस्वी विद्यार्थ्यांचा पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील, पर्यवेक्षक जी.डी. नेरले व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विभाग प्रमुख के.डी. शिवणकर, मराठी भाषा शिक्षिका एस.एस. चव्हाण, एस.एम. आंबेकर व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचेही कौतुक करण्यात

आले.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...