नवानगर काताळे येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार.
महिला मंडळांच्या सक्रिय सहभागासह उत्साहात आयोजन
गुहागर ( सुजित सुर्वे)– तालुक्यातील समुद्राच्या सान्निध्यात वसलेल्या नवानगर काताळे येथील श्री हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा होणार आहे. दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत हा उत्सव पारंपरिक धार्मिक विधींसोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला असेल.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिला मंडळांचा सक्रिय सहभाग. मंदिर परिसराची आकर्षक फुलांनी सजावट, भक्तांसाठी भजन, गजर, गाणी तसेच महाप्रसादाच्या तयारीत महिला मंडळांचे विशेष योगदान आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या सहभागातून गावातील एकात्मतेचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ६.१५ वाजता श्री हनुमान जन्मसोहळा धार्मिक विधीने साजरा केला जाईल. या निमित्ताने हनुमान चालीसा पठण, कीर्तन, नामस्मरण तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. भाविकांसाठी विशेष महाप्रसादाची व्यवस्था असून, रात्री स्थानिक ग्रामस्थ यांचं श्रुश्राव्य भजन आणि पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यावर भर दिला गेला आहे.
या चार दिवसांच्या उत्सवात परिसरातील भाविकांसह दूरवरून येणाऱ्या भक्तगणांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. श्री हनुमान मंदिर देवस्थान नवानगर काताळे यांच्या वतीने सर्वांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
⭕. सोबत कार्यक्रम पत्रिका देत आहोत.????
