शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनाची घोषणा – काव्यरूपात होणार शिवचरित्राचा जागर
महाराष्ट्र दिनी भिवंडी येथे होणार ऐतिहासिक कविसंमेलन; १५ एप्रिलपर्यंत सहभागासाठी कविता पाठवण्याचे आवाहन
मुंबई | गुरुदत्त वाकदेकर –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा काव्यरूपात जागर करणाऱ्या पहिल्या ‘शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनाचे’ आयोजन १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील नव्याने उभारलेल्या शिवमंदिराच्या पवित्र परिसरात हे भव्य संमेलन पार पडणार आहे.
हा उपक्रम “मराठी साहित्य व कला सेवा”, “राष्ट्रकुट”, “अखिल आगरी साहित्य विकास मंडळ, शाखा – भिवंडी” आणि “शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. या स्पर्धात्मक कविसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्यस्थापना, युद्धनीती, प्रशासनकौशल्य आणि प्रेरणादायी प्रसंगांवर आधारित स्वरचित मराठी कविता सादर करण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे वैशिष्ट्ये –
कवितेचे स्वरूप कोणतेही असू शकते: मुक्तछंद, छंदबद्ध, गझल, अभंग, पोवाडा किंवा गीत
कविता मराठी भाषेतच असावी व शिवचरित्राशी संबंधित असणे आवश्यक
प्राथमिक फेरी ऑनलाइन स्वरूपात होणार
१५ एप्रिल २०२५ पर्यंत टंकलिखित आणि ध्वनीमुद्रित कविता फक्त व्हॉट्सअॅपवर पाठवायची
निकाल २० एप्रिल रोजी अधिकृत समूहावर जाहीर
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कवींना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निमंत्रण
पारितोषिके व सन्मान –
सर्व सहभागी कवींना आकर्षक ऑनलाइन प्रमाणपत्र, अंतिम फेरीतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम दिली जाणार आहे. स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून वयोमर्यादा नाही, मात्र मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे.
उपक्रमाचे आयोजक –
या ऐतिहासिक साहित्यिक उपक्रमासाठी निर्मला मच्छिंद्र पाटील (समन्वयक), गुरुदत्त वाकदेकर (संस्थापक अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा), प्रकाश ओहळे (संपादक – राष्ट्रकुट), सुनील पाटील (अखिल आगरी साहित्य विकास मंडळ) आणि डॉ. राजूभाऊ चौधरी (संस्थापक अध्यक्ष – शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट) यांनी पुढाकार घेतला आहे.
कविता पाठवण्यासाठी संपर्क –
गुरुदत्त वाकदेकर – ९९८७७४६७७६
हॅशटॅग्स:
#शिवशौर्यकविसंमेलन #शिवचरित्र #शिवस्मरण #मराठीकविता #भिवंडीकार्यक्रम #महाराष्ट्रदिन२०२५ #शिवप्रेरणा #स्वराज्यगाथा #मराठीसाहित्य