कोंडगाव दळवीवाडी येथे चौपदरीकरण काम रोखलं! सर्विस रोडच्या अभावामुळे ग्रामस्थ आक्रमक
दोन वर्षांच्या आश्वासनांनंतरही फसवणूक; हायवे विभाग व ठेकेदार कंपनीवर गंभीर आरोप
✍️ भरत माने | साखरपा
रत्नागिरी-नागपूर चौपदरीकरण प्रकल्पाचा वेग वाढत असताना, कोंडगाव येथील दळवीवाडी व वाणीवाडी परिसरातील ग्रामस्थांनी आज संतप्त होत काम थांबवले. कारण – या ठिकाणी सर्विस रोडसाठी कोणतीही तरतूदच नाही!
ग्रामस्थांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून ‘रवी इन्फ्रा’ ठेकेदार कंपनी आणि हायवे विभागाकडे सतत पाठपुरावा करूनही फक्त आश्वासनांवरच निभावलं जात आहे. त्यामुळे त्यांनी अखेर रस्त्यावर उतरून काम रोखण्याचा निर्णय घेतला.
मुख्य मागण्या काय आहेत?
मेढे ते मुरलीधरवाडीपर्यंत सर्विस रोडची मागणी
शाळकरी मुले, व्यापारी, पाळीव जनावरांसाठी सुरक्षित पादचाऱ्यांची गरज
नदी, स्मशानभूमी दुसऱ्या बाजूला असल्याने दळणवळणातील अडचणी
विकासकामास विरोध नाही, पण भविष्यातील धोके टाळण्यासाठी योग्य उपाय आवश्यक
ग्रामस्थांनी स्पष्ट केलं की, शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडताना धोका संभवतो. पाण्याचा आणि अंत्यसंस्कारासाठी जाण्याचा मुद्दाही गंभीर आहे. प्रशासन आणि संबंधित कंपनीने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा जनआंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: ▶️