ब्रेकिंग बातमी: 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

banner

💥ब्रेकिंग बातमी: 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात!

 

NIA व R&AW च्या संयुक्त मोहिमेनंतर भारतात आणला गेला; दिल्लीत चौकशीसाठी हलवला

 

नवीदिल्ली – 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सुञधारक तहव्वूर राणाला तब्बल १६ वर्षांनंतर अखेर भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेने गुरुवारी राणाचा प्रत्यार्पण आदेश दिल्यानंतर एनआयए आणि रॉच्या संयुक्त टीमने त्याला भारतात आणले. बुधवारी दुपारी विशेष विमानाने तो दिल्ली विमानतळावर उतरला.

 

राणाला कडक सुरक्षेत बुलेटप्रूफ वाहनातून थेट NIA मुख्यालयात नेण्यात आले. यावेळी दिल्ली पोलिसांनी रस्ते बंद करत सुरक्षा व्यवस्था वाढवली. SWAT कमांडो आधीच तैनात करण्यात आले होते. एनआयए मुख्यालयात राणासाठी विशेष चौकशी कक्ष तयार करण्यात आला असून, केवळ १२ अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे.

 

तहव्वूर राणा याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता असून, त्याआधी वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवले जाणार असून, विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

 

 

 

#तहव्वूरराणा #26_11हल्ला #NIA #IndiaExtradition #TerrorMastermind #BreakingNews #DelhiSecurityAlert #तिहारतुरुंग

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...